
उगादी आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘फेस्टिव्ह मेगा डील्स‘ जाहीर
इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर भरपूर सूट
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारताचे विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहाचा ब्रँड असलेल्या क्रोमाने, उगादी आणि गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी शानदार ‘फेस्टिव्ह ऑफर्स’ची घोषणा केली आहे. या सेलचे मुख्य आकर्षण लॅपटॉप्स असून गेमिंग, एआय आणि डेली कॉम्प्युटिंग डिव्हाइसेसवर मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे. यासोबतच निवडक एअर कंडिशनर्स, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि इतर होम अप्लायन्सेसवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.उगादी आणि गुढीपाडवा हे सण नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जातात. अशा शुभ प्रसंगी क्रोमाच्या या ऑफर्स ग्राहकांना नवीन आणि प्रगत फीचर्स असलेल्या डिव्हाइसेसमध्ये अपग्रेड करण्याची एक उत्तम संधी देत आहेत. बँक कॅशबॅक, एक्सचेंज बोनस, विद्यार्थ्यांसाठी खास सवलती आणि सुलभ ईएमआय यांसारख्या अनेक फायद्यांचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. हा या सीझनमधील सर्वात धमाकेदार इलेक्ट्रॉनिक्स सेल असून, ३१ मार्चपर्यंत सर्व क्रोमा स्टोअर्समध्ये सुरू राहणार आहे.
इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “उगादी आणि गुढीपाडवा हे नवी सुरुवात करण्यासाठी शुभ मानले जाणारे सण आहेत आणि आम्हाला असे दिसून आले आहे की, अनेक ग्राहक त्यांच्या घरासाठी आणि वैयक्तिक गरजांसाठी अर्थपूर्ण अपग्रेडच्या शोधात असतात. आमची नवीन फेस्टिव्ह मोहीम विशेषतः लॅपटॉपवर केंद्रित आहे, जी दैनंदिन जीवनातील पर्सनल कॉम्प्युटिंगचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. अत्यावश्यक होम इलेक्ट्रॉनिक्सवरही दमदार डील्स देऊन, आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य आणि खरेदीचा आनंद मिळेल याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे.”
या फेस्टिव्ह सीझनमध्ये लॅपटॉप डील्सची एक शानदार रेंज सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये हाय-परफॉर्मन्स गेमर्सपासून ते विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सपर्यंत प्रत्येकासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ‘लॅपटॉप बोनान्झा’ मध्ये तुम्ही तुमचे अपग्रेड अधिक फायदेशीर बनवू शकता, कारण येथे एचपी, लेनोवो आणि असूस सारख्या ब्रँड्सच्या निवडक एनव्हीडिया आरटीएक्स50 सिरीज गेमिंग लॅपटॉपवर २५% पर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. यासोबतच, तुम्ही अगदी नवीन एआय पावर्ड लॅपटॉपसह निवडक विंडोज लॅपटॉपवर २०% पर्यंत एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकता.
येथे लॅपटॉपवरील काही धमाकेदार ऑफर्सची माहिती दिली आहे. एचपी नेक्स्ट जेन (कोपायलट प्लस) एआय पीसी हा ७८,४७६ रुपये किमतीचा लॅपटॉप आता फक्त ५१,६९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर डेल १५ लॅपटॉप (कोअर आय५, १६ जीबी रॅम) ज्याची मूळ किंमत ६४,९९० रुपये होती, ती आता कमी होऊन ५३,०९० रुपये झाली आहे. तसेच एचपी १५ लॅपटॉप (२४ जीबी रॅम) हे ५३,२६६ रुपये एमआरपी असलेले मॉडेल आता ४७,४६० रुपयांमध्ये मिळत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विशेष ऑफर अंतर्गत ॲपल मॅकबुक निओ १३ फक्त ३८,७०६ रुपयांमध्ये, तर ऍपल मॅकबुक एअर १३ (एम५ चिप)फक्त ८३,९०५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, आणि मॅकबुकच्या दोन्ही ऑफर्समध्ये विद्यार्थी/शिक्षक सवलत, ब्रँड कॅशबॅक आणि जुन्या लॅपटॉपचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.
क्रोमा ‘होम कॅटेगरी’मध्ये अनेक रोमांचक ऑफर्स देत आहे, ज्यामध्ये ग्राहकांना निवडक एअर कंडिशनर्सवर २ ईएमआय -फ्री, रेफ्रिजरेटर्सवर शानदार मोफत भेटवस्तू आणि निवडक टेलिव्हिजनवर १ ईएमआय -फ्रीसोबत ३०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. टेलिव्हिजन विभागात सॅमसंग १००” निओ क्यूएलईडी ४के टीव्ही हा १३,३६,६०० रुपये किमतीचा टीव्ही आता ७०% च्या भरघोस सवलतीसह फक्त ३,८४,९९० रुपयांपासून उपलब्ध आहे, तर एलजी ७५” नॅनो सेल ४के टीव्ही हा २,१७,५९० रुपये किमतीवरून ६२% डिस्काउंटसह फक्त ८२,६२२ रुपयांमध्ये मिळत आहे. होम अप्लायन्सेसमध्ये व्होल्टास १टी इन्व्हर्टर एसी ५२,३९० रुपयांवरून २५,५९० रुपयांमध्ये, ब्लूस्टार १.५ टन इन्व्हर्टर एसी ७८,५०० रुपयांवरून ४०,९६६ रुपयांमध्ये, आणि हॅवेल्स कूलएक्सप्रेस-आय कूलर १९,९९० रुपयांवरून ९,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
या फेस्टिव्ह ऑफर्स सर्व बजेट आणि गरजा असलेल्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आल्या आहेत. ग्राहक मर्यादित कालावधीसाठी या ऑफर्सचा लाभ देशभरातील सर्व क्रोमा स्टोअर्समध्ये आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट क्रोमा डॉट कॉम वर घेऊ शकतात. (नियम आणि अटी लागू)*अंतिम ऑफर किमतींमध्ये लागू बँक कॅशबॅक, जुन्या डिव्हाइसचे एक्सचेंज मूल्य आणि अतिरिक्त एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.

Comments are closed.