२०२५ मध्ये विकल्या गेलेल्या चारपैकी प्रत्येकी तीन एअर प्युरिफायरची एकट्या दिल्ली-एनसीआर क्षेत्रात विक्री
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक सदस्य, क्रोमाने आपल्या ऑनलाईन व ऑफलाईन चॅनेल्समध्ये २०२५ मधील विक्रीच्या आकडेवारीच्या आधारे एयर प्युरिफायर्सच्या खरेदीबद्दल माहिती प्रकाशित केली आहे. ही माहिती दर्शवते की, एयर प्युरिफायर्सची मागणी भारतातील कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त होती. ग्राहकांच्या वाढत्या प्राथमिकता, ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयांवर डिझाईन आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव, ग्राहकांच्या गरजांमधील बदल आणि बाजारपेठेतील ट्रेंड्स हे समजून घेण्यात देखील ही माहिती मदत करते.
अहवालानुसार, क्रोमामध्ये झालेल्या एअर प्युरिफायर्सच्या एकूण विक्रीपैकी ७२% विक्री दिल्ली-एनसीआरमध्ये झाली, या भागातील प्रदूषित हवेमुळे लोकांकडून दिली जात असलेली ही प्रतिक्रिया असल्याचे समजून येते. महाराष्ट्र १२% विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक ४% सह तिसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी दर्शवते की, इतर राज्यांमध्ये देखील वायू प्रदूषणाच्या बाबतीत जागरूकता आणि एअर प्युरिफायर घेण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.
एचईपीए फिल्टरची निवड करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वात जास्त आहे, कारण त्यामध्ये धूळ, परागकण आणि बुरशी यासारखे हवेमध्ये आढळणारे कण दूर करण्याची क्षमता असते. प्रदूषके आणि गंधांपासून सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा (प्री-फिल्टर्स, सक्रिय कार्बन फिल्टर्स आणि यूव्हीसी एलईडी तंत्रज्ञानाचे कॉम्बिनेशन) असलेली प्रगत मॉडेल्स अनेक ग्राहकांनी निवडली आहेत.
इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले, “एयर प्युरिफायर्स आता खास किंवा सीजनल उरलेले नाहीत, तर एक अत्यावश्यक वस्तू बनलेले आहेत. खासकरून दिल्ली-एनसीआरसारख्या शहरांमध्ये ग्राहकांसाठी ही अत्यावश्यक वस्तू बनलेली आहे. क्रोमामध्ये आमचे सर्वात जास्त लक्ष ग्राहकांना त्यांच्या खोलीचा आकार, बजेट आणि आरोग्यासंबंधी गरजा यांच्या आधारे योग्य प्युरिफायर निवडण्यात मार्गदर्शन करण्यावर केंद्रित आहे. आम्ही हे देखील सुनिश्चित करतो की, ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञान आणि त्यांच्या घरांमध्ये सहज फिट होऊ शकेल असे डिझाईन अगदी सहजपणे मिळावे.”
ग्राहकांनी सर्वात जास्त पसंती सफेद रंगाला दिली आहे. अभ्यासातून असे दिसून येते की, भारतभरामध्ये विकले गेलेले ७७% एयर प्युरिफायर सफेद रंगाचे होते, त्यानंतर १९% काळ्या तर ४% मेटॅलिक शेड्सचे होते. ही आकडेवारी सांगते की, ग्राहक न्यूट्रल, मिनिमलिस्ट रंग पसंत करतात, जे घरातील जास्तीत जास्त सजावटीला अनुरूप ठरतात.
अभ्यासात असे आढळून आले आहे की, ५००० ते १५००० रुपयांची बजेट रेन्ज हा व्हॉल्युमच्या दृष्टीने सर्वात मोठा सेगमेंट आहे, या सेगमेंटमध्ये एकूण एयर प्युरिफायर विक्रीमध्ये क्रोमाचा वाटा ४९% आहे. सुपर-प्रीमियम सेगमेंटमध्ये क्रोमामध्ये झालेल्या विक्रीचा वाटा ३६% आहे, जी पुढची सर्वात मोठी श्रेणी आहे. यावरून दिसून येते की, बहुतांश ग्राहक हे अधिक चांगले कव्हरेज आणि स्मार्ट सुविधा असलेल्या उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. फिलिप्स आणि डायसन यांनी मिळून २०२५ मध्ये क्रोमामध्ये एयर प्युरिफायर्सच्या एकूण विक्रीचा ८४% वाटा नोंदवला, या श्रेणीत त्यांची आघाडी यावरून अधोरेखित होते.
क्रोमाने फक्त एका आठवड्यात आपल्याकडील एयर प्युरिफायर्सची आजवरची सर्वाधिक साप्ताहिक विक्री नोंदवली, जी कंपनीच्या वार्षिक एयर प्युरिफायर्सच्या विक्रीचा २७% भाग होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी एयर प्युरिफायर्सची विक्री ३०% ने वाढली, हे सध्याच्या हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण आहे. ही भारी वाढ दर्शवते की, ग्राहक स्पष्ट दिसून येणारे प्रदूषण, बदलते हवामान आणि हवेच्या गुणवत्तेशी संबंधित बातम्यांवर वेगाने प्रतिसाद देत आहेत आणि आपल्या घरांना एयर प्युरिफायर आणून तातडीने अपग्रेड करत आहेत.
क्रोमाच्या जवळपास १२% ग्राहकांनी आपल्या एयर प्युरिफायर्सची कामगिरी पुढे दीर्घकाळपर्यंत चांगलीच राहावी यासाठी त्यांना क्रोमाच्या झिपकेयर योजनांसोबत सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देखील निवडला आहे. यामध्ये वाढीव वॉरंटी आणि सेवा मदत यांचा समावेश आहे. क्रोमा ग्राहकांची खरेदी आणि सध्या बाहेरच्या स्थितीचे सातत्यपूर्ण विश्लेषण यावरून याची पुरेपूर काळजी घेतात की प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण होतील.
Comments are closed.