नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या सरफराज खानने जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तरुणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. सरफराज मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्याने गुपचुप लग्न उरकलं आहे. सरफराज खाननं काश्मीरमधील रोमाना जहूर या तरुणीसोबत लग्न केलं आहे. काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पशपोरा गावात हा लग्नसोहळा पार पडला.
सरफराज खानने गाजावाजा न करता गुपचुप लग्न केलं आहे. आता सरफराज खान आणि पत्नी रोमाना यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. निकाहच्या फोटोंमध्ये सरफराज, रोमाना आणि त्यांचे कुटुंबिय खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोंमध्ये सरफराज काळ्या शेरवानीमध्ये तर रोमाना लाल आणि गोल्डन रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत आहे. या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.