बंगुलुरू/एनजीएन नेटवर्क
इस्त्रो आठवड्यात एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रो चांद्रयान-3 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून लाँचिगसाठी काउंटडाऊनही सुरू झाले आहे. या कामगिरीनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा चौथा देश बनेल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इस्त्रोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चंद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 02:35 वाजता होणार आहे. इस्रो 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल, असे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या आंशिक यशानंतर इस्त्रोने चांद्रयान-3 मधील प्रत्येक संभाव्य त्रुटीचा सामना करण्यासाठी 4 वर्षांत अशा चाचण्या सातत्याने घेतल्या, असेही सोमनाथ यांनी सांगितले. चंद्रयान 2 चं प्रक्षेपण देखील जुलै महिन्यात करण्यात आलं होतं. त्याचं खास कारण देखील आहे. वर्षाच्या या वेळी पृथ्वी आणि त्याचा उपग्रह चंद्र एकमेकांच्या खूप जवळ असतात. चंद्रावर लँडिंग करायचं असेल, तर तिथं प्रकाश असणे गरजेचे आहे. चंद्रयान 2 सारखी चूक करणं जमणार नाही. 15 दिवस चंद्रावर प्रकाश असतो, तर 15 दिवस अंधार… चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्यामुळे तिथं सूर्योदय कधी होतो, वेळ काय, ठिकाण कोणते… यानुसार प्रक्षेपणाची तारीख ठरवणं गरजेचं असतं. त्यामुळे 14 जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे.