NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

त्र्यंबकला ‘या’ मंदिरातील देणगीच्या वाटपावरून दोन घटकांत संघर्ष

0

त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क

 दानपेटीतल्या उत्पन्नाच्या वाटपावरून येथील निवृत्तीनाथांच्या मंदिरातील पुजारी आणि वारक-यांमध्ये खटका उडाला आहे. देणगीतला 60 टक्के वाटा मंदिर व्यवस्थापनावर खर्च केला जातो तर 40 टक्के भाग हा पुजा-यांना दिला जातो. या वाटपावर आक्षेप नोंदवत वाकर-यांनी थेट धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. आता यावर नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे शहर वासियांचे लक्ष लागून राहणार आहे.

वाकर-यांच्या मते, पुजा-यांना उत्पन्नातला वाटा न देता नोकरी म्हणून पगार द्यावा. तथापि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून उत्पन्नातला वाटा देण्याची प्रथा असल्याचा दावा पुजा-यांनी करत वाकर-यांच्या मागणीला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. 2015 मध्ये धर्मदायुक्तांनी दिलेल्या निकालानुसार हे वाटप सुरू असल्याचा दावाही पुजा-यांनी केला आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व वारकरी प्रतिनिधींनी मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे आणि धर्मदाय आयुक्तांकडे उत्पन्नातील हिस्सा ऐवजी पगार देण्याबाबत मागणी केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.