नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहर सायबर पोलिसांनी सायबर गस्त वाढवून एका विशिष्ट ‘सॉफ्टवेअर’चा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना मिळते आहे.
शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम असून, सायबर गस्तीनुसार सर्वांच्या प्रोफाइल्सवरील पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच एका विशिष्ट सॉफ्टवेअरची खरेदी नाशिक पोलिसांनी केली आहे. आक्षेपार्ह मेसेज व पोस्ट टाकल्यास त्वरित त्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. यासह आयुक्तालयाने परिसरात करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत. दरम्यान संमिश्र वस्ती, संवेदनशील ठिकाणी गोपनीय यंत्रणा सतर्क केली आहे. आयुक्तालयातील विशेष शाखेसह पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखा विशेष खबरदारी घेत आहे.