NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महापुरुषांना गुरु मानून त्यांचा आदर्श घ्यावा : ह.भ.प. गणेश महाराज करंजकर

0

भगूर/दीपक कणसे

जीवनात आदर्श अतिशय महत्वाचा असून तो जर चुकला तर जीवन धुळीला मिळत असल्याचे सांगतांना आदर्श घ्यायचाच असेल तर भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वा. वि. दा. सावरकर यांच्यासारख्या थोर पुरुषांचे आदर्श घ्यावे. दुर्बुद्धी हि मनुष्याला अधोगती कडे घेऊन जात असल्याचे थोर महापुरुषांचे विचार आचरणात आणल्याने जीवन नक्कीच यशस्वी होते.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रवचनकार भगूर रत्न हभप गणेश महाराज करंजकर यांनी येथे केले.

भगूर येथील तुळसा लॉन्समध्ये बुधवार दि. १९ पासून मंगळवार दि.२५ पर्यंत अधिक मासानिमित्त येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य विष्णू पुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या समारोप प्रसंगी हभप गणेश महाराज करंजकर यांनी भगवान श्रीकृष्णच्या लीलांचे वर्णन केले.  तरुणाईला मार्गदर्शन करताना व्यसन व फॅशन यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.  कथेदरम्यान शिवराम बोऱ्हाडे यांनी गायन केशव करंजकर- तबला तर संतोष करंजकर,रवींद्र बोऱ्हाडे,बाळू शिंदे यांनी साथसांगत केली. समारोपप्रसंगी माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांसह,सेवेकारी,इच्छापूर्ती शिव मंदिर येथील सदस्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष शशिकांत लोया,सचिव लक्ष्मीनारायण कलंत्री, प्रसिद्ध उद्योजक राजु मुंदडा,पंकज कलंत्री, मनीष झवर,शिवसेना भगूर शहर प्रमुख विक्रम सोनवणे,शाम चांडक,राजू लोया,शाम लाहोटी,राकेश लोया,संजय लाहोटी,संतोष लोया,प्रशांत लोया,सिद्धांत मुंदडा,प्रशांत कलंत्री,गोपी लाहोटी,संग्राम करंजकर,नितीन करंजकर,शाम ढगे,राजु चांडक,गणेश निसाळ,दिगंबर करंजकर,रमेश बागुल,पियुष नहार,गोरख गाढवे,आदींसह माहेश्वरी समाजबांधव व विशेषता भगूर पंचक्रोशीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन ममता लोया, प्राध्यापक ललित भदे,संदीप शेटे आदींनी केले. समारोपानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कथा सोहळा यशस्वीतेसाठी माहेश्वरी समाज,महिला व युवा मंडळ व भगूर येथील ग्रामस्थ प्रयत्नशील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.