पुणे/एनजीएन नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात पक्षाच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.
प्राप्त माहितीनुसार, टिळक स्मारक संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. पण टिळक स्मारक संस्थेच्या वतीने हा पुरस्कार ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला ते रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्यावरुन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेपाबाबतचे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथीदिनी अर्थात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जातो. यंदा देखील १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार पुण्यात देण्यात येणार आहे.