NGN News
Latest Marathi News

‘सर्वांनी मला माफ करा’.. म्हणत संगणक अभियंत्याकडून टोकाचे पाऊल

नवीन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आधी शिक्षण आणि नंतर नोकरीसाठी नाशिकमध्ये वास्तव्याला असलेल्या मूळ जळगावमधील संगणक अभियंत्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यश वसंत कोलते असे त्याचे नाव असून त्याच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. मूळ जळगावच्या जामनेर येथील असलेल्या यश याचे गेल्या अनेक वर्षांपासून नाशकात वास्तव्य होते. दोन दिवस कंपनीत न गेल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी चौकशी केली असता यश याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. आपल्या घरात गळफास घेत त्याने हे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबीय, मित्र आणि शेजारी यांना धक्का बसला.

सुसाइड नोट आढळली

दरम्यान, यश याने मृत्युपूर्वी सुसाइड नोट लिहिली असून त्यामध्ये ‘मला नेहमीच चिंता वाटते, मी सामान्य व्यक्तीसारखे जगू शकलो नाही; सर्वांनी मला माफ करावे’, असा मजकूर आहे. अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

Comments are closed.