- कर्करोग शस्रक्रिया तज्ञ डॉ. अंबरीश चॅटर्जी यांच्यासह टीमची यशस्वी कामगिरी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
एसएमबीटी हॉस्पिटलच्या एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतीच १६ वर्षांच्या मुलीवर अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीची समजली जाणारी मोठ्या यकृतातील गाठीची (लिव्हर ट्यूमर) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटलचे कर्करोग शस्रक्रिया तज्ञ (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) डॉ. अंबरिश चॅटर्जी यांच्यासह त्यांच्या टीमने यशस्वी केली. या कामगिरीमुळे डॉ. अंबरीश चॅटर्जी आणि संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशस्वी शस्रक्रीयेनंतर एसएमबीटी हॉस्पिटलमधील आधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अधिक माहिती अशी की, १६ वर्षांची अस्मिता (नाव बदललेले) हिच्या यकृतामध्ये सुमारे १२ x १० x १२ सें.मी. आकाराची मोठी गाठ आढळून आली होती. ज्यामध्ये यकृतचे २, ३ आणि ४ भाग समाविष्ट होते. बायोप्सी रिपोर्ट केल्यानंतर ही गाठ फोकल नोड्युलर हायपरप्लेशिया (FNH) असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीय आणि डॉक्टर्स यांच्या निगराणीखाली ही रुग्ण होती. त्यानंतर, अलीकडेच लक्षणे आढळून आल्यामुळे कुटुंबियांशी चर्चा करून शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ चॅटर्जी यांनी सांगितले. हि शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि अवघड स्वरुपाची होती. शिवाय गुंतागुंत अधिक असल्यामुळे येथील शस्रक्रियातज्ञ आणि भूलतज्ञ यांच्यासाठी अधिक आव्हानात्मकदेखील होती.
एसएमबीटी हॉस्पिटलचा मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक मार्गदर्शनाचा करार आहे. त्यामुळे याठिकाणी उपलब्ध असलेले तज्ञदेखील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलेले आहेत. डॉ. अंबरीश चॅटर्जी यांनी देखील याच ठिकाणी शिक्षण घेऊन नाशिकमध्ये तब्बल १० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देत आहेत. ते एसएमबीटीमध्ये असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार एसएमबीटीत करणे शक्य झाले आहे. डॉ. चॅटर्जी यांनी सांगितले की, लहान वयात ट्यूमर किंवा इतर गंभीर आजार आढळण्यामागे अनुवांशिक कारणे, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, पर्यावरणीय प्रदूषण आणि ताणतणाव ही कारणे असू शकतात. आधुनिक तपासणी तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान लवकर होत असून उपचार तत्काळ सुरु करण्यास प्रारंभ झाला आहे. शरीरात यकृत आणि हृदय हे अतिशय जवळ-जवळ असते. यामुळे शरीरात रक्त संक्रमण करणाऱ्या सर्व लहान मोठ्या धमन्या या भागात असल्याने अधिक रक्तस्राव होतो. खूप बारकाईने या शस्रक्रिया केल्या जातात. या शस्रक्रीयेसाठीही तब्बल १२ तासांपेक्षा अधिक वेळ लागला.
डॉ. चॅटर्जी यांनी रुग्णावर लेफ्ट हेपॅटेक्टॉमी मोठी शस्त्रक्रिया करून यकृतातील प्रभावित भाग (सेगमेंट २, ३ आणि ४) काढून टाकला. शस्त्रक्रिया दरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर होती. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशा शस्त्रक्रियांमध्ये भूलतज्ञ आणि आयसीयू टीमची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याशिवाय रेडिओलॉजी विभागाने केलेल्या अचूक तपासण्या आणि इमेजिंगमुळे शस्त्रक्रियेचे योग्य नियोजन करणे शक्य झाले.
तसेच हॉस्पिटलमधील सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयसीयू आणि वॉर्डमधील प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ तसेच रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स (RMO) यांनी शस्त्रक्रियेच्या आधी व नंतर महत्वाची भूमिका बजावली. या शस्त्रक्रियेमध्ये विविध विभागांच्या डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले. एसएमबीटी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांच्यासह संपूर्ण व्यवस्थापनाकडून डॉ. अंबरीश चॅटर्जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांवर केमोथेरपी, सर्व प्रकारच्या कर्करोग शस्त्रक्रिया, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कार-टी सेल थेरपी, बाल-कर्करोग तपासणी व उपचार याठिकाणी पूर्णवेळ केले जातात.
—–
मोठ्या शस्रक्रीयांसाठी समन्वय महत्वाचा
यकृतासारख्या अवघड अवयवांवरील मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी अनेक विभागांचे समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक असते. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये २६ पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी विभाग एकाच छताखाली कार्यरत असल्यामुळे आणि योग्य वेळी योग्य विभागाची मदत मिळाल्यामुळेचे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
डॉ. अंबरीश चॅटर्जी
कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
एसएमबीटी हॉस्पिटल
लवकरच पेट स्कॅन व रेडीएशन थेरपी
एसएमबीटीत मेडिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. संदीप इशी, सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. अंबरीश चॅटर्जी व डॉ. विनायक शेनगे, बालरोग कर्करोगतज्ञ डॉ. पिंकी शाह–काळे, तर हेमॅटो ऑन्कोलॉजीस्ट (ब्लड कॅन्सर) डॉ. गिरीश बदरखे सेवा देत आहेत. गेल्या वर्षभरात १५ पेक्षा अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि कार-टी सेल थेरपी याठिकाणी झाल्या. लवकरच अत्याधुनिक पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपी सुरू होणार आहे. यापुढे एसएमबीटी हॉस्पिटल हे सर्वसमावेशक कर्करोग केअर सेंटर म्हणून काम करेल.
–सचिन बोरसे, सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल
Comments are closed.