NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पवार धमकी प्रकरणी गुन्हा;  राऊतांना धमकी देणारे दोघे जेरबंद

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणात आज दोन मोठ्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. 

शरद पवार यांना एका ग्रुपवर तुमचा दाभोळकर करु अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन धमकी प्रकरणाची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणावर चांगलीच आक्रमक झाली आहे. पवारांना धमकी देणारा आरोपी भाजपशी संबधित असल्याचे म्हटले जात आहे.  शरद पवार धमकी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहेत. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आणि त्यांचे बंधू आमदार सुनील यांना देखील फोनवरून धमकी आली. धमकी देणाऱ्याने संजय राऊत यांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी अथवा भावासह जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली. राऊत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.