पालघर/एनजीएन नेटवर्क
आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना बारावीच्या विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात असून तिची निर्घृण हत्या देखील करण्यात आली. पालघरच्या मोखाड्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्चना उदार नामक ही विद्यार्थिनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक महाविद्यालयात बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचा संशय सध्या पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अर्चना आश्रम शाळेतून महाविद्यालयामध्ये जात होती. त्यावेळी तिच्यावर तिच्या मित्राने कोयत्याने वार करुन जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अर्चना गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या लोकांना तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. पंरतु त्यावेळी अर्चना दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवसाच्या अवघ्या एका दिवसानंतर अर्चनाचे आयुष्य संपले. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना उदार आणि आरोपी प्रभाकर वाघेरा यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण या विद्यार्थिनीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे विद्यार्थिनीने देखील लग्न करण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरुन आरोपी प्रभाकरने तिला भर रस्त्यात महाविद्यालयात जात असताना अडवले. त्यावेळी तिच्यावर त्याने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली.