घोटी/राहुल सुराणा
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तब्बल चार किलोमीटर पायपीट करीत इगतपुरीच्या अतिदुर्गम चिंचलेखैरे येथील शाळेला भेट दिली. महसूल सप्ताहानिमित्त तालुका दौऱ्यावर असलेल्या शर्मा यांनी चिंचलेखैरेवासीयांच्या समस्याही जाणून घेतल्या.
महसूल सप्ताहानिमित्त जनसंवाद कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चिंचलेखैरेची निवड केली. तथापि तेथे पोहचताना शर्मा यांना चार किलोमीटर पायपीट करावी लागली. तेथे पोहचून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांना औक्षण करून पारंपारिक रीतीने त्यांचे स्वागत केले. शालेय परिसर तसेच शालेय वातावरण पाहून या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट खेळाडू घडवावेत असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना आनंद झाला. शाळेची शिस्त शाळेतील उपक्रम तसेच शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी शाळेचे कौतुक केले .
याप्रसंगी वन विभागाचे प्रमुख केतन उमाकांत बिरारी, आरएफओ उपस्थित होते. इगतपुरी त्रंबकेश्वर चे प्रांत ठाकरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तहसीलदार अभिजीत बारवकर .इगतपुरी ,गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड. इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, बांधकाम विभागाचे अभियंता शेख तसेच कृषी विभागाचे सेवक व महसूल विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांना गावातील विविध सुविधांबाबत सरपंच मंगा खडके यांनी माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे तथा केंद्रप्रमुख इगतपुरी नंबर एक यांनी जिल्हाधिकारी व सर्वांचे आभार मानले