नाशिक/एनजीएन नेटवर्क
इगतपुरीनजीक एका पाड्यावर गर्भवती महिलेच्या प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर रस्त्याअभावी तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आता नवा ट्विस्ट आला आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला प्रसूतीपूर्व वेदना नसल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी महिलेने किडनी स्टोनसाठी एका वैदूकडून औषध घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकाराची विधीमंडळ अधिवेशनात जोरदार चर्चा घडून आली होती.
जिल्हाधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत असून त्यांनी महिलेला प्रसूती वेदना नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिची प्रसूतीची तारीख 9 सप्टेंबर असल्याचे रेकॉर्डवरून दिसून येत आहे. शासकीय प्राथमिक रुग्णालयात तिची तपासणी झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. तरीही नेमका तिचा मृत्यू विसेरातील अहवालानंतर मिळू शकेल, असे सांगत याबाबतची संपूर्ण सखोल चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले. गर्भवती महिलेसोबत तिच्या अर्भकाचाही मृत्यू झाला आहे. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात वनिता यांनी प्राण सोडला. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या दाव्याने या प्रकरणाला धक्कदायक वळण आले आहे.