NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सायबर सुरक्षा अंतर्गत सीएमसीएस महाविद्यालयाची निवड 

0

नाशिक : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी क्विक हिल फाउंडेशन, पुणे ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमातंर्गत नाशिक जिल्ह्यातून मविप्रच्या वाणिज्य, व्यवस्थापन आणि संगणकशास्त्र (सीएमसीएस) महाविद्यालयाची निवड करण्यात आली. 

महाविद्यालयातील ‘साहिल सोनवणे–अध्यक्ष’, ‘हर्षदा बोरसे- सचिव’, ‘अंजली दाऊद-मिडिया’ तर ‘हितेश बाबिस्कर -डायरेक्टर या चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसरपदी तर १६ विद्यार्थ्यांची सायबर वॉरियर्स म्हणून निवड झाली. निवड प्रक्रियेमध्ये सायबर सुरक्षा जाणीव, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व क्षमता आणि संवाद कौशल्ये या घटकांचा विचार करण्यात आला होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात सायबर सुरक्षा क्षेत्रात कार्यशाळा, संवादसत्रे, जनजागृती मोहिमा व इतर शैक्षणिक उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे. यासाठी फाउंडेशनतर्फे महाविद्यालयास व विद्यार्थ्यांसाठी विशेष फंडाची तरतूद करण्यात आली. आयक्यूएसी समन्वयक प्रा. अमित मोगल, सायबर समन्वयक प्रा. स्वाती तपकिरे यांचे मार्गदर्शन लाभले. क्विक हिल फाउंडेशनचे अध्यक्ष अनुपमा काटकर, सचिव अजय शिर्के, संचालक गायत्री केसकर, संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर शेलार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.