मुंबई/एनजीएन नेटवर्क
तलाठी परीक्षेप्रसंगी झालेल्या पेपर फुटी प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच तलाठी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पेपर फुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी यासाठी वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलत असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पेपर फुटी प्रकरणावर चौकशी करण्यासाठी दोन विशेष ओएसडी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी पेपरफुटी प्रकरणावर याआधीदेखील प्रतिक्रिया दिलीय. खून करणाऱ्याला जशी मृत्यू दंडाची शिक्षा केली जाते अगदी त्याच धर्तीवर किंवा तशीच कठोर शिक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना देण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.