रायगड/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी इथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंगर चढून स्वत: घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचुन त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा आढावा घेतला आणि पीडितांशी संवाद साधला. या दुर्घटनेमध्ये बारा जणांचा मृत्यू झाला असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थनिक नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘एनडीआरएफ’ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी काही तरुण स्वतःहून पुढे आले आहेत.
मुख्यमंत्री सकाळी सव्वा सात वाजल्यापासूनच इर्शाळवाडीत पोहोचले होते. मात्र त्यावेळी डोंगरावर चढून जाऊन शक्य नसल्यानं मुख्यमंत्री पायथ्याशी थांबले होते. पाऊस थांबल्यानंतर एकनाथ शिंदे पायवाटेनं डोंगर चढून गेले. ज्या ठिकाणी पीडितांना आसरा देण्यात आलाय. तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. आवश्यक ती सगळी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.