NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जाहिरात नाट्यानंतर पालघर मुक्कामी शिंदे-फडणवीसांचे ‘तुझ्या गळा..’

0

पालघर/एनजीएन नेटवर्क

‘शासन आपल्या दारी’ योजनेचा कार्यक्रम आज पालघरमध्ये पार पडला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरच्या दिशेने रवाना झाले. जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. यावेळी ते काय बोलतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, जाहिरातीच्या मुद्द्यावरून आमच्यात मतभेदाची दरी निर्माण होवू शकत नाही, याची ग्वाही देत दोघांनी विरोधकांची हवा गुल केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पालघरमध्ये बोलत होते.

हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आमचं सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय. आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचलं. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सुरुवातीला आम्ही दोघेच मंत्रिमंडळात होतो. आता त्यामध्ये अनेकांचा समावेश झाला. कोणाला वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय घेतला नाही. सगळे निर्णय जनतेसाठी घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हे सरकार तकलादू नाही : फडणवीस

एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतके हे सरकार तकलादू नाही, आम्ही 25 वर्षं एकत्र होतो, मात्र या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट आहे असे म्हणत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला. तर दुसरीकडे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. 

फडणवीस पुढे म्हणाले,  शिंदे आणि माझा प्रवास हा 25 वर्षांचा असून आम्ही दोघेही गेल्या 25 वर्षांपासून एकत्र काम करतोय पण गेल्या वर्षभरात आमचे नाते घट्ट झाले आहे,  आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षांपासून आहे. पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत  करणार आहे. महात्मा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत सामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. कुठल्या जाहिरातीमुळे किंवा कुणी काही बोललं म्हणून काही तरी होईल एवढं तकलादू आपलं सरकार नाही. जोपर्यंत सामान्य जनतेचे काम होणार नाही तोपर्यंत हे सरकार काम करत राहणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.