** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
तालुक्यातील भाक्षी येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
भाक्षी येथील प्राचीन देवस्थान खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव नुकताच संपन्न झालेला आहे. यात्रोत्सव जागेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणकचरा पसरलेला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांनी गावात नुकतीच स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत लोकनियुक्त सरपंच चेतन वनीस, संस्थापक सरपंच व विद्यमान सदस्य श्रीकांत रौंदळ, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा सरचिटणीस दादा खरे, ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम बच्छाव, रावण पवार, वस्तू व सेवा कर मालेगाव कार्यालयातील पदाधिकारी अक्षय रौंदळ, मयूर वाघ, मनोज खैरनार, बच्चू सोनवणे यांचे सह स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरम्यान भाक्षी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यातील मानेंची वाडी( तालुका पाटण) या आदर्श गावच्या ग्रामपंचायतीस भेट देऊन येथील विकास कामांची पाहणी केली आहे. भविष्यात भाक्षी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातही महत्त्वपूर्ण अशी विकास कामे करण्याचा संकल्प ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
Comments are closed.