नाशिक : स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्युरन्स ही भारतातील आघाडीची आरोग्य विमा सेवा देणारी कंपनी असून कंपनीने गेल्या १५ महिन्यांमध्ये (एप्रिल २०२२ ते जून २०२३ या काळात) नाशिकमध्ये क्लेम सेटलमेंटच्या रुपात १३८ कोटी रुपये दिले आहेत. कंपनीने ११० कोटी रुपये हे क्लेम सेटलच्या रुपात आपल्या नेटवर्कमध्ये असलेल्या हॉस्पिटलला दिले असून २८ कोटी रुपये नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलसाठी योग्य प्रमाणात क्लेम सेटलच्या रुपाने दिले आहेत.
स्टार हेल्थने नाशिकमध्ये कॅशनेस क्लेम सेटलमेंटच्या रुपात १०६ कोटी रुपये दिले आहे आणि ३२ कोटी रुपये रिइम्बर्समेंट क्लेमच्या रुपात दिले आहेत. ग्राहकांना दिलेल्या वचनानुसार कंपनीने सर्व कॅशलेस क्लेम्स केवळ २
तासांमध्ये सेटल केले आहेत. बहुतांश केसेसमध्ये सुरुवातीच्या दोन तासांमध्येच कॅशलेस ट्रिटमेंटसाठी परवानगी दिली गेली आहे. ग्राहकांना क्लेम सबमिट केल्यानंतर सात दिवसांच्या आत त्याला रक्कम मिळावी हे कंपनीचे ध्येय आहे. रिएम्बर्समेंटच्या मार्गानेही क्लेम केला जात असेल तर तो विनासमस्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
एप्रिल २०२२ ते जून २०२३ या १५ महिन्यांच्या काळात नाशिकमधील ७३ कोटी रुपयांचे सर्वाधिक क्लेम हे वैद्यकीय उपचारांसाठीचे होते. क्लेम सेटलमेंटमध्ये सर्जिकल ट्रिटमेंटची रक्कम ६५ कोटी रुपये होती. याशिवाय नाशिकमध्ये क्लेमची रक्कम दिलेल्यांचे विश्लेषण केले तर असे दिसून येते की ५५ कोटी रुपयांचे क्लेम महिलांनी केलेले होते तर ८३ कोटी रुपयाची रक्कम पुरुषांनी केलेल्या क्लेमच्या रुपात होती.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्युरन्स कं. लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर श्री सनथ कुमार यांनी सांगितले की,
नाशिकमध्ये स्टार हेल्थने क्लेम लवकर सेटल केले आणि कॅशलेस उपचारांसाठीही लगेच परवानगी दिली, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. या भागातील ग्राहकांशी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहकांना कायम सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न असतो, मग ते ग्राहकांसाठी तयार केलेले नवनवीन उत्पादने असो वा ग्राहकांचे क्लेम सेटल करणे असो.. नेहमीच चांगली सेवा देण्याचे काम स्टार हेल्थने केले आहे. आम्ही आमच्या हॉस्पिटलचे नेटवर्स सक्षम करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या निवासी भागात कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध होऊ शकेल आणि क्लेम सेटल करणेही सोपे जाईल.
आलेल्या क्लेम्सचा अभ्यास आणि विश्लेषण केले असता स्टार हेल्थ इन्श्युरन्सला असे आढळून आले आहे की, विम्याबद्दल जनजागृती करणे हे आव्हान आहे. पॉलिसाधारकांमध्ये त्यांचे विमा कवच, त्याचे फायदे आणि पॉलिसी टर्म्स यांची समज कमी असते. कंपनीच्या मते भारतात आरोग्य विमा पॉलिसीबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणेच एक आव्हान आहे. लोकांमध्ये जनजागृती झाल्यास त्यांना २४ बाय ७ टेलिमेडिसिन फॅसिलिटीचा लाभ घेता येईल, ग्राहकांनी सुदृढ राहावे यासाठी वेलनेस प्रोग्रामचा लाभ घेऊन रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी करू शकतात. याशिवाय मोफत वार्षिक हेल्थ चेकअप करून घ्यावे आणि इतर अनेक लाभही मिळवावे. स्टार हेल्थ अॅपच्या माध्यमातून देशाच्या कोणत्याही भागातून या सर्व सेवा-सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येतो. याशिवाय अॅपमुळे डॉक्टरांचे कन्सल्टेशन व्हिडिओद्वारे मिळते. त्यामुळे डॉक्टरांशी थेट संवाद साधता येतो वर योग्य निदानही होते. स्टार हेल्थ अॅप अँड्राईडसाठी प्ले स्टोअरवरून तर आयओएससाठी अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल.