नाशिक/एनजीएन नेटवर्क
ठेकेदाराने गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने सिटीलिंकचे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी, नाशिक शहरातील शहरातील वाहतूक सेवा विस्कळीत झाली. पहाटेपासून सर्व चालक -वाहक संपात सहभागी झाले आहेत.
ठेकेदाराला कोट्यवधी रुपये रोख मोजून देणाऱ्या पालिकेकडून 500 वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. ठेकेदारावर कोणतेही कारवाई होत नसल्याने सिटीलिंकचे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. म्हणूनच त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा पवित्र घेतला आहे. शहरात आज एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे. दरम्यान, महापालिकेच्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याने सिटी लिंककडून ठेकेदाराला झालेला दंड कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याचा ठेकेदाराचा इरादा असल्यानेच वाहकांचा पगार थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
@ ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन थकवल्यामुळे वाहकांनी आज आज काम बंदचा इशारा दिल्याने सकाळपासून वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यामुळे ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून संप टाळण्याचे निर्देश दिले आहेत.
- मिलिंद बंड, व्यवस्थापक, सिटीलिंक