नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहापूर येथे बिऱ्हाड मोर्चा थांबलेला आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरून दोनही बाजूची वाहतूक सुरू आहे. यादरम्यान आज दुचाकीस्वार युवतीचा भीषण अपघात झाला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असतांना अपघातग्रस्त ठिकाणी थांबून त्यांनी अपघातग्रस्त युवतीला मदत केली.
यावेळी भुजबळ यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त युवतीला मुख्य रस्त्यावरून तातडीने बाजूला केले. यावेळी बिऱ्हाड मोर्चाच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांना तातडीने बोलवून अपघातग्रस्त युवतीवर प्राथमिक उपचार करून तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.