हैदराबाद/एनजीएन नेटवर्क
आंध्रप्रदेशच्या मैसूरुमध्ये एक आचंबित करणारी घटना घडली आहे. इथल्या एका भामट्याने आपण डॉक्टर आणि इंजिनिअर असल्याचा बनाव करुन एक दोन नव्हे तर तब्बल १५ महिलांना चूना लावलाय. या व्यक्तीने १५ महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक केलीये. बंगळूरमधील बानाशंकरी भागात राहणाऱ्या महेश केबी नायक या व्यक्तीने २०१४ पासून एकूण १५ महिलांशी लग्न केलंय. हे प्रकरण तेव्हा प्रकाशात आले, जेव्हा मैसूरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली.
महेशने मॅट्रीमोनिअल साइटचा वापर जाळ्यासारखा केला, ज्यावर त्याने स्वत: डॉक्टर आणि इंजिअर असल्याचा बनाव केला. जास्तीत जास्त महिला जाळ्यात अडकाव्या यासाठी त्याने खोटा दवाखानाही बनवला होता आणि त्यात सहकार्यासाठी नर्सही ठेवली होती. मैसूरुमधील एका महिलेने त्याच्या विरुद्ध तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली. या महिलेशी त्याने २०२३मध्ये आंध्रप्रदेशमध्ये लग्न केलं होतं. महेशने क्लिनिक सुरु करण्यासाठी तिच्याकडे पैसे मागात मारहाण करायला सुरुवात केली. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तो त्या दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला.
पोलिसांनी सांगितले की, महेश ज्या महिलांशी लग्न करायचा त्या उच्च शिक्षित आणि कमावणाऱ्या होत्या. पैश्यांसाठी या महिला त्याच्यावर अवलंबून नव्हत्या. या महिलांनी इज्जत जाऊ नये म्हणून आपली फसवणूक झाली याची जाणीव होऊन सुद्धा त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही.