NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल; ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा शक्य

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

ब्रिजभूषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना लवकरच शिक्षा होईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. हे आरोप झाल्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे धरले होते. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. दोन महिने चाललेल्या या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले असून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कलम ५०६ (धमकी देणे), ३५४ (विनयभंग); ३५४ अ (लैंगिक छळ); आणि ३५४ डी (पाठलाग करणे) सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सहापैकी दोन प्रकरणांमध्ये, सिंग यांच्यावर कलम ३५४, ३५४अ आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम 354 आणि ३५४ अ अंतर्गत ब्रिजभूषण यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.