मुंबई/एनजीएन नेटवर्क
युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास यांच्या कार्यक्रमात हा गोंधळ झाला आहे. टिळक भवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाल्यामुळे वातावरण तापले होते. चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊ यांना बदलण्याची मागणी केली होती. यानंतर हे दोन गट भिडल्याचे पाहायला मिळाले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या गटाने कुणाल राऊत यांना विरोध करताना बदलण्याची मागणी केली होती.