मुंबई/एनजीएन नेटवर्क
शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुटी बुधवार, २८ जून रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र, हा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्याने २८ जूनची सुटी रद्द करुन २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने काढली आहे.
दरम्यान, २९ तारखेलाच आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण आले आहेत. त्यामुळे दोन्ही सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्याने त्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. पण शासनाने यापूर्वी २८ जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी २९ तारखेला अशा सलग दोन सुट्या जाहीर झाल्या होत्या. पण आता शासनाने यात बदल केल्याने या दोन्ही सुट्याच एकाच दिवशी आल्याने एकच सार्वजनिक सुटी मिळणार आहे.