नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरण नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सोमवारी (२५ ऑगस्ट) रोजी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षवर्धन जगताप, व्यवस्थापक हेमंत भामरे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपकार्यकारी अभियंते तुषार राणे, दीपक गडलिंग यांचेसह अधिकारी, कर्मचारी व जनमित्र उपस्थित होते.
Comments are closed.