मुंबई/एनजीएन नेटवर्क
केंद्र सरकारने यावर्षी खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात बोलताना दिली. अधिवेशनात बोगस बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधक आक्रमक झाले. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर पवारांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले, कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली आहे. १६४ मेट्रीक टन साठा बियाणांचा जप्त केला आहे. २२ पोलीस केसस दाखल करण्यात आल्या आहेत. २० विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. १०५ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खतांसंदर्भात गुणनियंत्रण विभागाने १९० टन साठा जप्त केला आहे. त्यासंदर्भात १३ पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.