नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतगर्ता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच मिळणार आहे. दारिद्र्यरेषेखालील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी युरु करण्यात आलेल्या या योजनेचा आता सर्व आर्थिक गटातील लोकांना लाभ घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना केंद्र सरकरच्या जन आरोग्य योजनेत विलीन करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आता आयुष्मान भारत विमा योजनेशी जोडली जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना योजनेचा निधी 1.5 लाखांवरून 5 लाख करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत 54 लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी 10,550 कोटींचा खर्च सरकारतर्फे करण्यात आला आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले आयुष्मान भारत विमा योजनेशी जोडली जाणार आहे. यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचाराचा लाभ घेतलेल्या 54 लाख रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकार ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणांसह 50 क्रिटिकल केअर युनिट(ICU) सुरु करण्याचा विचार करत आहे.