NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

टोमॅटोच्या भडकलेल्या किमतीची केंद्राकडून दखल; घेतला ‘हा’ निर्णय

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला ‘सोन्याचा भाव’ मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात टोमॅटोचे किरकोळ भाव झपाट्याने वाढले आहेत. 14 जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून कमी दराने विकले जातील, असे  ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मुसळधार पावसामुळे टॉमेटोचा पुरवठा खंडित झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किंमती 200 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.