NGN News
Latest Marathi News

सेलेब्रिटी गायकाचा घटस्फोट; वैवाहिक आयुष्याच्या १७ वर्षांनंतर निर्णय

पुणे : एनजीएन न्यूज नेटवर्क

विवाहाला १७ वर्षे झाल्यानंतर सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी एक महत्त्वाचा निर्णय इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलाय. राहुल आणि पत्नी नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  घटस्फोटाबाबतची माहिती स्वतः राहुल देशपांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली.

पोस्टमध्ये त्यांनी नेहासोबतचे 17 वर्षांचे सहजीवन अनेक सुंदर आठवणींनी भरलेले असल्याचे नमूद केले असून आता दोघेही स्वतंत्रपणे आपले आयुष्य पुढे नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल आणि नेहा यांचा घटस्फोट सप्टेंबर 2024 मध्ये कायदेशीररीत्या पूर्ण झाला असून, हा निर्णय दोघांच्या परस्पर सहमतीने घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल आणि नेहा यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.