नाशिक/एनजीएन नेटवर्क
‘मेट’ संचालित भुजबळ नॉलेज सिटी येथे येथे सिडॅक पीजी डीप्लोमा कोर्ससाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रानिक्स व आयटी विभागाअंतर्गत येणाऱ्या सी-डॅक अॅक्टस पुणे मार्फत विविध पीजी डीप्लोमा कोर्सेस देशभरात चालवले जातात. आयटी क्षत्रात करियर करण्यासाठी सी डॅक ने पीजीडॅक पीजी डीबीडीए, पीजी एआय, इ. सारखे 14 वेगवेगळे सहा महीने मुदत असलेले कोर्सेस उपलब्ध केले आहेत. सीडॅक कोर्स नंतर अनेक चांगल्या पॅकेजची संधी उपलब्ध झाली असल्याकारणाने इंजिनिअरिंग, एम.एस.सी, एम.सी.ए ही पदवीत उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी या कोर्सकडे आकर्षित झाले आहेत.
सिडॅक सप्टेंबर 2023 या बॅचच्या प्रवेशासाठी दिनांक १५ व १६ जुलै 2023 रोजी सीकॅट ही प्रवेश परिक्षा घेण्यात येणार आहे, तरि प्रवेश परिक्षेच्या ऑनलाईन नोंदणी साठी ५ जुलै ही शेवटीची मुदत आहे. तरी आयटी क्षेत्रात करीयर करण्यासाठी उत्सुक असल्यांनी मुदतीत अर्ज करावा व अधिक माहितीसाठी सीडॅकच्या cdac.in या संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा मेट बीकेसी नाशिक येथे 8329487991 या नंबरवर संपर्क साधावा.