मुंबई/एनजीएन नेटवर्क
सीबीआयने मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदार ही केंद्रीकृत बँक असून आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात 269 कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात 118 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.