NGN News
Latest Marathi News

जबरदस्तीने धर्मांतर करवून विवाह करणाऱ्या तरुणाविरुध्द गुन्हा

  • नाशिकमधील धक्कादायक प्रकार; इतर पुरुषांसोबतही शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पिडीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवताना खोट्या नावाचा वापर करणे आणि तिचे जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह लावण्याच्या आरोपाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्यात एका युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे युवकाने पिडीतेला इतर पुरुषांसोबतही शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. सोहेल आवेश अन्सारी असे युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक रोड येथील एका दुकानात काम करणाऱ्या पीडितेचा सहा महिन्यांपूर्वी सोहेल याच्याशी परिचय झाला. तेव्हा त्याने आपले नाव विशाल जाधव असे असल्याचे खोटे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. गेल्या जुलै २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सोहेल याने पीडितेला मुंबई नाका परिसरातील मित्राच्या घरी नेत मौलवीच्या हजेरीत इस्लाम धर्म स्वीकारायला लावून बळजबरी धर्मांतर केले आणि तिथेच विवाहाचे सोपस्कार पार पाडले. विवाहानंतर सोहेलने पीडितेचा छळ सुरु केला. आर्थिक लाभापोटी त्याने तिला इतर पुरुषांसोबतही शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. काहीदा नकार दिला तेव्हा तिला मारहाण करून खासगी छायाचित्रे तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी दिली.

सोहेलच्या या वर्तनाला कंटाळून अखेर पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सोहेल याच्याविरोधात देहविक्रीस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.