NGN News
Latest Marathi News

कार्डिओलॉजिस्‍ट्सकडून सॅच्‍युरेटेड फॅट्स, पाम तेलाचे विज्ञानाधारित मूल्‍यांकनाचे आवाहन 

  • आयएमए नॅटकॉन २०२५ : शंभराव्‍या पर्वामध्‍ये हजारो डॉक्‍टर्स, संशोधक व आरोग्‍यसेवा प्रमुख एकत्र

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

१०० व्‍या नॅशनल कॉन्‍फरन्‍स ऑफ द इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए नॅटकॉन २०२५)मध्‍ये कार्डिओलॉजिस्‍ट्सनी आहारातील फॅट्स व कार्डिओव्‍हॅस्‍कुलर आरोग्‍याबाबत अधिक पुरावा-आधारित माहितीसाठी आवाहन केले, तसेच दीर्घकाळापासून असलेल्‍या गृहीतकांचे सर्वसमावेशक वैज्ञानिक पुराव्‍यानुसार पुनरावलोकन करावे यावर भर दिला. आयएमए नॅटकॉनच्‍या शंभराव्‍या पर्वामध्‍ये भारतभरातून हजारो डॉक्‍टर्स, संशोधक व आरोग्‍यसेवा प्रमुख एकत्र आले, ज्‍यासह वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्‍य दृष्टिकोनांना आकार देण्‍यासाठी प्रमुख प्‍लॅटफॉर्म म्‍हणून आयएमए नॅटकॉनची भूमिका अधिक प्रबळ झाली आहे.

डॉ. वरूण बंसल आणि डॉ. केतन मेहता यांच्‍या दोन तज्ञ-नेतृत्वित सत्रांमध्‍ये अनेकदा चुकीची माहिती दिल्‍या जाणाऱ्या विषयांबाबत वैद्यकीय स्‍पष्‍टता करण्‍यात आली, तसेच वैद्यकीय पुरावा आणि जागतिक संशोधनाच्‍या दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून आहारामधील फॅट्स, पाम तेल आणि उदयास येत असलेल्‍या कार्डिओमेटाबोलिक हस्‍तक्षेपांच्‍या भूमिकेचे परीक्षण करण्‍यात आले. 

‘अॅथेरोस्‍क्‍लेरोसिस, आहारातील सॅच्‍युरेटेड फॅट्स आणि पाम तेल: यांच्‍यामध्‍ये खरंच संबंध आहे का?’ या आपल्‍या सादरीकरणामध्‍ये डॉ. बंसल यांनी हृदयसंबंधित आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सॅच्‍युरेटेड फॅट्सशी संलग्‍न दीर्घकाळापासून असलेल्‍या गृहीतकांना आव्‍हान केले. विविध देशांमध्‍ये केलेल्‍या संशोधनांमधून त्‍यांनी निदर्शनास आणले की, सॅच्‍युरेटेड फॅट्सची पौष्टिकता एकसमान नसते आणि कार्डिओव्‍हॅस्‍कुलर आजाराचा धोका एकूण आहार पद्धती, जीवनशैली आणि एकूण कॅलरी सेवन यावर अवलंबून असतो. तसेच त्‍यांनी निदर्शनास आणले की, विशिष्‍ट फॅट पर्यायांमुळे कोलेस्‍ट्रॉल कमी होऊ शकते, पण कार्डिओव्‍हॅस्‍कुलर आजाराचा धोका कमी करू शकत नाही. ट्रान्‍स फॅट्ससोबत तुलना केल्‍यास पाम तेलाचे अनुकूल महत्त्व दिसून येते. त्‍यांचे सत्र डब्‍ल्‍यूएचओ आणि आयसीएमआर-एनआयएन मार्गदर्शकतत्त्‍वांशी संलग्‍न होते, जे योग्‍य प्रमाण, तेलांची विविधता आणि संतुलित सेवनावर भर देतात.

”साध्‍या लेबल्‍सवर असलेल्‍या पोषण विज्ञानाबाबत माहितीकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. यामध्‍ये संतुलन, विविधता आणि योग्‍य निवड महत्त्वाचे आहेत,” असे डॉ. वरूण बंसल म्‍हणाले. 

तसेच, डॉ. मेहता यांनी सादरीकरण ‘पाम टोकोट्रिएनॉल्‍स इन कार्डिओमेटाबोलिक सिंड्रोम’ सादर केले, जेथे भारतात मधुमेह, लठ्ठपणा, उच्‍च रक्‍तदाब व डायस्लिपिडेमियाच्‍या वाढत्‍या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. त्‍यांनी लाल पाम तेलामधील व्हिटॅमिन ईचा प्रकार टोकोट्रिएनॉल्‍सबाबत माहिती दिली, तसेच टोकोट्रिएनॉल्‍सच्‍या अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट, अॅण्‍टी-इन्‍फ्लेमेटरी (दाह कमी करणारे) आणि हदयासाठी अनुकूल क्षमतेचे पुरावे निदर्शनास आणले. डॉ. मेहता यांनी पाममधून मिळणाऱ्या टोकोट्रिएनॉल्‍सच्‍या प्रबळ सुरक्षित प्रोफाइलला देखील निदर्शनास आणले, जेथे यूएस एफडीएकडून जीआरएएस दर्जा मिळाला आहे. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांनी जीवनशैली व क्लिनिकल केअरसोबत सहाय्यक, विज्ञानाचे पाठबळ असलेला हस्‍तक्षेप म्हणून टोकोट्रिएनॉल्‍सच्‍या भूमिकेवर भर दिला. 

”कार्डिओमेटाबोलिक सिंड्रोम गुंतागुंतीची व अनेक घटकांची स्थिती आहे. रूग्‍णांची काळजी घेताना योग्‍यरित्‍या संशोधन केलेल्‍या पौष्टिक घटकांचा समावेश करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे,” असे केतन मेहता म्‍हणाले.

या सत्रांना उपस्थिती वैद्यकीय व्‍यावसायिकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. सक्रिय चर्चा व प्रश्‍नोत्तरे सत्रांमधून सध्‍याच्‍या वैज्ञानिक पुराव्‍याच्‍या माध्‍यमातून दीर्घकाळापासून आहारसंबंधित असलेल्‍या गृहीतकांचे पुन्‍हा मूल्‍यांकन करण्‍याप्रती आवाहन करण्‍यात आले. या चर्चासत्रांनी कार्डिओव्‍हॅस्‍कुलर व चयापचय आरोग्‍याकरिता संतुलित, पुरावा-आधारित आहारसंबंधित मार्गदर्शनाला पाठिंबा देण्‍यासाठी वैद्यकीय समुदायामधील सुरू असलेल्‍या विज्ञान-ने‍तृत्वित संवादाच्‍या महत्त्वाला निदर्शनास आणले.   

Comments are closed.