नाशिक/एनजीएन नेटवर्क
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तथा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही कारवाई करण्यात आलेली नाही. याप्रकरणी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कुस्तीपटू महिला आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा योगिता आहेर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात कँडल मार्च आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
नवीन नाशिकमधील महाराणा प्रताप चौकापासून कँडल मार्चला प्रारंभ झाला. यावेळी अन्याय झालेल्या महिला क्रीडापटूंच्या समर्थनार्थ आणि सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मोर्चेकारांना साथ देताना आढळून आले. ज्येष्ठ नेते नाना महाले यांच्या फार्मजवळ मार्चचा समारोप झाला. कॅन्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांमध्ये पुष्पा राठोड, पुष्पा वाघ, मंगला मोरे, योगिता पाटील, संगिता पाटील, संजिविनी जाधव, मीनाक्षी काकळीज, रुपाली पठारे, अपेक्षा अहिरे, संगीता चौधरी, पूजा चौधरी, रेखा चौधरी, महानंदा कोंगे यांचा समावेश होता.