नवी दिल्ली /एनजीएन नेटवर्क
केंद्रातील मोदी सरकारच्या भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
या योजनांवर कॅगचे ताशेरे…
- भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची तूट
- आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल केंद्रावरून नोंद
- आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेलाया 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.
- अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.
- ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी स्वच्छ भारत योजनेचे फलक लावण्यासाठी वळवले.
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान
- द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.
कॅगच्या अहवालानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या देशात एक देश विरोधी आणि मोदी विरोधी संस्था आहे. तीचं नाव कॅग आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय कटाची बळी पडली आहे. या संस्थने गेल्या काही दिवसात एकदोन नव्हे तर सात घोटाळे उघड केले आहेत. त्यामुळे कॅगवर मोदींनी तात्काळ ईडीचा रेड मारली पाहिजे, असा टोला सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला आहे.