NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

लोकसभा निवडणुकीबाबत मायावतींच्या ‘बसप’ची भूमिका अखेर जाहीर..

0

लखनौ/एनजीएन नेटवर्क

बहुजन समाज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर विचारमंथन करण्यात आलं. या बैठकीबाबत पक्षाकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच पक्ष मजबूत करण्याच्या सूचनाही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत. 

मायावतींनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भाजपच्या संकुचित जातीवादी आणि धार्मिक राजकारणामुळे, द्वेषभावना आणि अराजकतेला आश्रय देणार्‍या सर्व जनतेचे जीवन संकटात सापडलं आहे. भाजप आता केवळ आपला प्रभावच नाही, तर आपला जनाधारही गमावत आहे. त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नाही. ही निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल.

मायावती म्हणाल्या , काँग्रेसप्रमाणेच भाजपच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठा फरक आहे. त्यांच्या राजवटीत उत्पन्न कमी आणि खर्च खूप झाला आहे. काही मूठभर लोक सोडले तर इतर सर्वांना, विशेषत: बहुजन कुटुंबांना आपला उदर्निवाह करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.