जळगाव/एनजीएन नेटवर्क
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे राज्य समन्वयक तथा माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी येथे मध्यम संवादादरम्यान सांगितले.
महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांतील माजी आमदारांसह विविध नेत्यांनी आमच्यासोबत संपर्क केला आहे. त्याबाबतची यादी मोठी आहे. राज्यातील गावागावांत आतापर्यंत १९ लाख पदाधिकारी नियुक्त झाले आहेत. पक्षाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता महाराष्ट्रातील जनतेचाही कल बदलतोय. आता आपले अस्तित्व संपणार आहे, हे लक्षात आल्यानंतर या प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. सध्या प्रस्थापित पक्षांना जनता कंटाळली आहे. पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव राज्यात लवकरच सभांचा धडाका लावणार असल्याचेही धोंडगे म्हणाले.