येवला/एनजीएन नेटवर्क
काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजात शिवाजी संभाजी नावे नसतातच विदेची देवी सरस्वती बद्दल बेताल वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केले होते. या बेताल वक्तव्याचा आज येवला तहसील तसेच भुजबळ संपर्क कार्यालयासमोर ब्राह्मण महासंघ संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
भुजबळांकडून वारंवार ब्राह्मण समाजाला अपशब्द वापरले जातात शिवाज, संभाजी नावे ब्राह्मण समाजाच्या शोधण्या पेक्षा भुजबळांच्या घरात ही नावे आहेत का? स्वतःच्या संस्थांना त्यांनी अशी नावे दिलीत का? सावित्रीबाई, ज्योतिबा यांची तरी नावे स्वतःच्या कुटुंबात आहेत का? भुजबळांच्या या वक्तव्याचा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत. मंत्रिमंडळातील जबाबदार नेते असताना असे जातीय वक्तव्य भुजबळांना शोभते का? आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत त्यांच्या बद्दल वारंवार चुकीचे उल्लेख करत असून अश्या जातिवाचक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन येवला तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना देखील जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन देण्यात आले भुजबळ संपर्क कार्यालयात लोंढे यांना देखील निवेदन देण्यात आले. या वक्तव्यावर त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे.
ब्राह्मण महासंघ विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाज कधीही जातीपातीचे राजकारण करत नाही. सलग तीन टर्म मतदारसंघातून निवडून येताना ब्राह्मणांची मते तुम्हाला पडली नव्हती का असा सवाल करीत प्रसिद्धीसाठी आमच्या देवतांवर टीका करणे भुजबळांनी थांबवावे, असा इशारा दिला. या सगळ्याची उत्तरे येणाऱ्या निवडणुकीत ब्राह्मण समाज मतपेटीतून देईलच असा इशारा देत निषेध नोंदवला. यावेळी अध्यक्ष आनंद दवे, विश्वस्त मनोज सारे विश्वस्त स्मिता कुलकर्णी, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड विजय कुलकर्णी, जिल्हा संघटक स्वाती सावरगावकर, परशुराम प्रतिष्ठान येवला अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष गणेश जोशी, उपाध्यक्ष अक्षदा जोशी, प्रणव दीक्षित, श्रीरंग सावरगावकर,पार्थ सावरगावकर, मनीषा कुलकर्णी, संजय सबनीस, अमित पाटील, वडगाव शेरी पुणे अध्यक्ष राहुल आवटी, अक्षय कुलकर्णी, श्रीपाद जोशी, रवी कुलकर्णी, आकाश कुलकर्णी, अनिल गोसावी, शशिकांत जोशी, बंटी जोशी, अमेय कुलकर्णी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते