** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
आगामी महावीर जन्मकल्याणक महोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे सकल जैन समाजाची बैठक पार पडली. बैठकीत महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे भव्य व सुयोग्य नियोजन करण्यासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यामध्ये मयूर बोरा यांची अध्यक्षपदी तर डॉ. स्वप्निल जैन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सक्षम धाडीवाल यांची उपाध्यक्षपदी तर भाग्यश मुनोत यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून दर्शन लुनावत यांची उपखजिनदार म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महावीर जन्मकल्याणक महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरज अब्बड, समकीत धाडीवाल, स्वराज भंडारी, ऋषभ चोपडा, मलय पटणी, प्रियंश बागमार, तनय दगडे, हर्षल संचेती, राज कसलीवाल, दर्शन जांगडा, दर्शन जैन आणि वीर साबद्रा यांची निवड करण्यात आली.
ही बैठक संघपती नितीन जैन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस ओमप्रकाश राका, डॉ. विजय बागरेचा, संतोष ब्रह्मेचा, सुनील चंडालिया, विनोद ताथेड, नितीन नाहाटा, मनोज रेदासनी, सुरेश चोरडिया, निलेश पटणी, मनोज जीशिंगी, निलेश छाजेड, मनोज मुथा, आदर्श चोरडिया व कल्पेश धाडीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments are closed.