नव्या पिढीला मार्गदर्शनासाठी पुस्तक मैलाचा दगड ठरेल : प्रा. बच्छाव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वाचनातून घडलो आणि त्यामुळेच 63 व्या वर्षीही सक्रिय आहे. कारण त्याकाळी तेवढे सकस लिहिले जात असे. आता त्यासाठी नव्या पिढीला मार्गदर्शन करावे लागणार आहे. त्या दृष्टीने प्रा. गिरीश पाटील यांचे ‘चला लेखणी ऊचलुया’ हे पुस्तक निश्चितच मैलाचा दगड ठरू शकेल, असा विश्वास प्रा. दत्तात्रय बच्छाव यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बच्छाव क्लासेस चे संचालक प्रा.दत्तात्रय बच्छाव होते. प्रा.श्रीकांत सोनवणे तन्मय प्रकाशनचे संचालक ब्रीजकुमार परिहार व्यासपिठावर उपस्थित होते.
” माझे वडील गावी शेती सांभाळून वाचनालयाचे काम सांभाळायचं . त्यामुळे वाचन कला मला घरातून मिळाली.पुस्तक माणसाला घडवितात.चांगली पुस्तक चांगली माणसे घडवितात.चांगली पुस्तक देखील लिहिली गेली पाहिजे.त्यासाठी डॉ.गिरीश पाटील यांनी लिहिलेले पुस्तक समाजासाठी उपयोगी पडेल.” असे सांगून इतिहासिक पुस्तकांचे अनेक अनुभव प्रा.दत्तात्रय बच्छाव शेयर केले. ते डॉ.गिरीश सी.पाटील यांच्या ” चला लेखणी उचलूया ” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बच्छाव क्लासेस चे संचालक प्रा. दत्तात्रय बच्छाव होते.नाशिक येथील तन्मय प्रकाशन आणि सीआरपी इन्स्टिट्यूट तर्फे ” चला लेखणी उचलूया…या डॉ.गिरीश सी .पाटील यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बच्छाव क्लासेस येथे करण्यात आले होते.
” वाचन चळवळ एका बाजूला राबविले जात आहे.पण दुसरी कडे लेखकांची फळी देखील उभी राहणे गरजेचे आहे.नव्या पिढीचे लेखक तयार होणे ही काळाची गरज आहे.त्याचा सूक्ष्म विचार करून डॉ. गिरीश सी.पाटील यांनी लेखन केले आहे.आपल्या जीवनात उपयोग करता येईल असे प्रेरणादायी पुस्तक त्यांनी लिहिले आहे.अशा पुस्तकांची गरज असल्याने त्यांचे हे पुस्तक नक्कीच यशस्वी होईल.असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्रीकांत सोनवणे यांनी केले.
त्यानंतर डॉ.गिरीश पाटील यांनी नवी पिढी लिहिती झाली पाहिजे.त्यांना देखील व्यक्त होता आले पाहिजे.लेखन हे माणसाला व्यक्त होण्याचे साधन आहे.त्यासाठी हे पुस्तक लिहिले.पुस्तक वाचून वाचकांनी लिहिते व्हावे हिच अपेक्षा आहे. असे मत पुस्तक विषयी व्यक्त केले.
तन्मय प्रकाशन चे संचालक ब्रिजकुमार परिहार यांनी आपले विचार मांडलेआधुनिक युगात तंत्रज्ञान विकसित झाले. चॅट जी पी टी आहे पण मानवी संवेदना या लेखनातून येतील.त्या दृष्टीने पुढील लेखन झाले पाहिजे.असे मत व्यक्त केले.डॉ. गिरीश पाटील यांच्या पुस्तकाचा विषय आवडला म्हणून मी पुस्तक हाती घेतले.असे सांगून डॉ. गिरीश पाटील यांना शुभेच्छा दिल्यात.या वेळी देशदूत चे पत्रकार आणि जेष्ठ लेखक नरेंद्र जोशी. साई समर्थ नाचरोपत्थी सेंटर चे संचालक डॉ.शामकुमार दुसाने ,इगतपुरी ग्रामीण साहित्य संघाचे अध्यक्ष आणि ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर अखील भारतीय मराठा युवक महासंघ, नाशिक शहर उपाध्यक्ष मनोज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.गिरीश सी पाटील यांचा बच्छाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय बच्छाव यांनी शाल श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. डॉ.शामकुमार दुसाने आणि मनोज चव्हाण , पुंजाजी मालुंजकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.गिरीश पाटील यांनी आभार व्यक्त केले.
Comments are closed.