नाशिक/एनजीएन नेटवर्क
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात अभिनव प्रयोगासाठी लौकिक राखून असलेल्या भाविक ग्रुपच्या ‘सेन्ट्रल पार्क’ या निवासी प्रकल्पाचे काम द्रुतगतीने पूर्णत्वाकडे जात असतानाच एका अभिनव योजना सदर करण्यात आली आहे. त्यानुसार, गुरुवार दि. २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान ‘सेन्ट्रल पार्क’ला भेट देवून सदनिका बुक करणाऱ्या ग्राहकांना हमखास बक्षीस देण्यात येणार आहे. तब्बल चार एकर परिसरात २५ हून अधिक अत्याधुनिक सुविधा बहाल करणारा हा प्रकल्प बदलत्या नाशिकच्या गरजांची पूर्तता करणारा ठरणार असल्याने नाशिककरांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे संचालक हेमल शहा यांनी केले आहे.
नाशिक शहराच्या उंटवाडी परिसरात सिटी सेंटर मॉलजवळ ‘सेन्ट्रल पार्क’ हा नवा प्रकल्प उभारला जात आहे. या देखण्या आणि विस्तीर्ण प्रकल्पात बड्या मेट्रोजमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा बहाल केल्या जाणार आहेत. नाशिकमध्ये आजवर उभारण्यात आलेल्या सर्वोच्च टॉवर्सपैकी ‘सेन्ट्रल पार्क’ एक असणार आहे. सुखी, संपन्न आणि सुरक्षित जीवनशैली व्यतीत करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. सोळा आणि अठरा मजल्यांच्या सहा देखण्या इमारतींत वन आणि टू बीएचके सदनिकांचे पर्याय उपलब्ध राहणार आहेत.
२५ हून अधिक अत्याधुनिक सुविधा ….
अधिक माहिती देताना शहा म्हणाले, ‘सेन्ट्रल पार्क’ या निवासी प्रकल्पामध्ये योगा झोन, त्रिस्तरीय सुरक्षा प्रणाली, किड्स प्ले एरिया, क्लब हाऊस, ग्रीन जीम, गणपती मंदीर, सिनिअर सिटीझन पार्क, पार्टी लॉन आदी २५ हून अधिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पापासून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बँका, एटीएम, पेट्रोलपंप, क्रीडा मैदान आदी सुविधा जवळच उपलब्ध आहेत. शांततामय जीवन उच्च गुणवत्तेच्या वातावरणात व्यतीत करण्यासाठी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून हा प्रकल्प नाशिककरांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.
.. तर हमखास बक्षीस मिळणार
उद्या ( दि.२१) पासून २४ सप्टेंबर पर्यंत ‘सेन्ट्रल पार्क’ला भेट देवून सदनिका बुक करणाऱ्या ग्राहकांना हमखास बक्षीस देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. गृहस्वप्न बाळगून असणाऱ्यांनी त्याच्या पूर्ततेसाठी प्रकल्पाला अवश्य भेट देण्याचे तसेच अधिक माहितीसाठी 9765113333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.