पिथौरागढ/एनजीएन नेटवर्क
उत्तराखंडच्या पिथौरागढ येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बागेश्वरच्या शमा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.
प्रवाशांनी भरलेली बोलेरो गाडी कोसळून 500 मीटर खोल दरीत कोसळली. यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. बागेश्वरच्या शामा येथून भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांची गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमा झाली होती. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चुराडा झाला. अपघातातील मृत हे बागेश्वर तालुक्यातील कपकोट, शामा आणि भानार येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.