अहमदनगर/एनजीएन नेटवर्क
राज्यात बोगस डिग्रीचे मोठे रॅकेट समोर आले आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांनी बनावट पदव्या विकणा-या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या टोळीतील एकाला अटक केली असून त्याच्याकडून जवळपास 200 बोगस पदव्या जप्त करण्यात आल्या आहे. ही टोळी अवघ्या 50 ते 60 हजारांमध्ये BHMS, MBA, पॅरामेडिकल, दहावी, बारावीचे प्रमाणपत्र द्यायची. या टोळीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचे समोर आले आहे.
नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसच 10 वी, 12 वीच्या बोगस मार्क्सशीट्सची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी आरोपी अशोक सोनावणेला अटक केली आहे.
नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसेच 10 वी, 12 वी चे बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्रे तयार करून त्याची 50 ते 60 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या रॅकेटचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट चालविणारा एक जण पकडण्यात आला असून त्याच्याकडून 10 वी, 12 वी चे बनावट गुणपत्रके, काही बनावट पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत. या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात बालिकाश्रम रोडवरील रुद्र एज्युकेशन सोसायटीचे पॅरामेडीकल कॉलेज चालविणारा अशोक सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे.