सटाणा/विशेष प्रतिनिधी
येथील समाधान दादाजी सोनवणे हा व्यक्ती पुण्याहून येत असताना रोड अपघातात मृत झाला. घराची परिस्थिती नाजूक दोन लहान मुली एक मुलगी फक्त पंधरा महिन्याची घरात सासु , दिर व पत्नी असा परिवार घराचा कर्ता पुरुष गेल्यानंतर घराची जी परिस्थिती होते ती खूप विदारक असते. अशा परिस्थितीत जर समाजाने व शासनाने सहकार्य केलं तर मोडलेला संसार परत उभा राहू शकतो परंतु या परिवाराची परीक्षा बँक ऑफ बडोदा च्या काही अधिकाऱ्यांनी घेतली.
केंद्र सरकारच्या १२ रुपये व २४ रुपये अशा प्रकारचा अपघाती विमा आपल्या खात्यातून कट होत असतो. हा किती फायद्याचा आहे हे आपल्याला ही घटना घडल्यावर लक्षात येते येणारा काळ कसा असेल हे कोणालाच माहीत नसते म्हणून केंद्र सरकारच्या अपघाती विमा प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. हाच. विमा कै.समाधान दादाजी सोनवणे यांनी काढलेला होता. नुसता विमा काढूनही चालत नाही त्याचा पाठपुरावाही गरजेचा असतो. जेव्हा सोनवणे परिवारावर आघात झाला त्यावेळेस त्यांची परिस्थिती खूप हलकीशी झाली. कुठलाही इतर विमा काढलेला नव्हता मात्र त्यांच्या खात्यातून २०२१ साली बारा रुपये कट झाले होते. हे परिवाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेकडे पाठपुरावा केला. बँकेला सर्व कागदपत्र सादर केली. मात्र बँकेने हे प्रकरण चालढकल करत फक्त टाईमपास केला. साहेबांच्या विनवण्या केल्या एक नाहीतर तब्बल पाच वेळेस कागदपत्र जमा केली तरीही कागदपत्र गहाळ व्हायची. या गोष्टीला दोन वर्ष झाली तरीही बँकेचे अधिकारी या परिवाराकडे लक्ष देत नव्हते मात्र सुशिक्षित विधवा पत्नीने आपली जिद्द सोडली नाही. ती म्हणाली जर*पंतप्रधान सुरक्षा कवच* केंद्र शासन विमा काढते तर त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला पाहिजे जर मी हा विषय सोडून दिला तर बँक अशाप्रकारे सगळ्यांना टाळाटाळ करून होणारा लाभ कधीही होऊ देणार नाही त्यामुळे मी विम्याची रक्कम मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बँकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत भेटी घेतल्या परंतु कोणीही दात दिली नाही. उपोषणाचा इशारा दिला तरीही टाळाटाळ केली जात होती. बँकेत गेल्यावर तोंडावर गोड बोलून बँकेवाले काढून देत होते.
अशा वेळेस शितल समाधान सोनवणे या विधवा महिलेने *शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी मित्र अशी ओळख असलेले भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांची भेट घेतली त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. दोन लहान मुली त्यांचा शिक्षण आणि उदरनिर्वासाठी आज रोजी मोठा प्रश्न निर्माण झालेला त्यांनी बघितला. आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलणे सुरू केले. जर काढलेला विमान नियमात बसत असेल तर पैसे का देत नाही असा थेट सवाल केला. तेव्हा बँकेचे अधिकारी जागे झाले आणि तब्बल *दोन लाख रुपयांचा विमा* शितल समाधान सोनवणे या महिलेच्या खात्यात वर्ग झाला. ज्या महिलेने बँकेच्या प्रशासना विरोधात विडा उचलला होता त्या महिलेला समाधान वाटले. अनेक असे बँकेचे व्यवहार शेतकरी करतात परंतु बँकेचे अधिकारी दात देत नसल्याने शेतकरी हतबल होतो आणि विषय सोडून देतो मात्र शीतल समाधान सोनवणे या महिलेने या रूपात बँकेचे अधिकाऱ्यांना काम करण्यास भाग पाडले आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला.
——————————-
@ कोणत्या व्यक्तीवर येणारी वेळ कशी असेल ती सांगून येत नाही. त्यामुळे* -पंतप्रधान सुरक्षा कवच विमा योजना* *केंद्र शासनाने दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत १२ रुपये व २४ रुपये या किमतीचा विमा प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी आवर्जून काढावा. त्यामुळे आपला परिवार सुरक्षित होऊ शकते.
– बिंदू शेठ शर्मा*
*भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी मित्र
————————-
@गरीब परिस्थिती व शेतकरी समाज पाहून राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी खूप त्रास देतात . पैसे ठेवण्याची वेळ आली तर गोड बोलतात देण्याची वेळ आली तर टाळाटाळ करतात. कर्ज प्रकरण व विम्या प्रकारात शासनाने खूप सवलती दिली आहेत परंतु त्या सवलती तळागाळापर्यंत पोहोचत नाही. परंतु *भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनी मला केलेली मदत अनमोल आहे. दोन वर्ष मी बँकेच्या दारात फिरत होती परंतु *शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा* यांच्यामुळे मला लाभ मिळाला. नाहीतर मी बँकेपुढे हात टाकले होते.
– शितल समाधान सोनवणे (विधवा पत्नी)