- ॲड. भगवान येलमामे : २२ फेब्रुवारी रोजी आयोजन; राज्यभरातील विद्यार्थी व धावपटूंना निमंत्रण
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील बीके एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय “बीके मॅरथॉन 2026” या भव्य धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पहाटे ५.०० ते सकाळी १०.०० या वेळेत पार पडणार आहे. या मॅराथॉनमध्ये ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा तीन गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील विद्यार्थी व धावपटूंना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड. भगवान येलमामे यांनी दिली.
स्पर्धेची सुरुवात मविप्र मॅरथॉन चौक, एमव्हीपी, गंगापूर रोड, नाशिक येथून होणार असून टर्निंग पॉइंट रतनजी मिठाईवाला व एसबीआय बँक, नाशिक येथे ठेवण्यात आला आहे. परतीचा मार्ग तोच राहणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दोन लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, तसेच प्रमाणपत्र व आकर्षक मेडल प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र, मेडल आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे.
ही मॅराथॉन विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
संस्थेचे सचिव डॉ. ॲड. भगवान निवृत्ती येलमामे यांनी राज्यभरातील विद्यार्थी व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी: 8888301363,8080195558 या क्रमांकावर संपर्क करावा.
मॅराथॉन नोंदणीकरिता https://runindia.in/events/BK-MARATHON-2026 या लिंकवर जाऊन आपण स्वत: नोंदणी करू शकता.
Comments are closed.