मालेगाव/राजेश सूर्यवंशी
येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मालेगाव जिल्हा तर्फे मोदी@9 कार्यक्रमांतर्गत मोटरसायकल रॅली व नव मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.
पूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल घेऊन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जनतेसमोर जाऊन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मालेगाव येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव तर्फे आज सकाळी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माल्यार्पण करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
बारा बंगला भागातील देवा पाटील यांचे संपर्क कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करून त्या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे व जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम यांच्या हस्ते नव मतदार नोंदणी अभियानाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येऊन नवं मतदार नोंदणीस सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस योगेश माईन व अमित सोलंकी यांनी या ठिकाणी युवा मोर्चाच्या पदाधिकारी व युवकांसोबत युवा संवाद साधला.
यावेळी मालेगाव बाह्य विधानसभा निवडणुक प्रमुख देवा पाटील यांनी १५ हजार नव्याने मतदार नोंदणी चे लक्ष निश्चित केले आहे. तरी नवं मतदारांनी जास्तीत जास्त नावे नोंदणी करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आले आहे.