नाशिक/एनजीएन नेटवर्क
माजी राज्यमंत्री दिवंगत मधुकर कांबळे यांना भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे नाशिक महानगर व भाजपा अनु.जाती मोर्चा तर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून ते म्हणाले की स्वर्गीय कांबळे यांचा कार्याचा आदर्श डोळयापुढे ठेवून समाज सेवेसाठी काम करावे हीच खरी श्रध्दांजली ठरेल.
भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या भाषणातून स्व.मधुकर कांबळे यांच्या जीवनातील प्रवासावर प्रकाश टाकला तसेच स्व.पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतून अत्योदयांची कल्पना त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचविली. त्यांच्या निधानाने राजकीय व सामाजिक पोकळी कधीही भरुन न निघण्यासारखी आहे, असे ते म्हणाले.
आ.सीमा हिरे म्हणाले की आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून विविध जनहितांच्या योजनेची अंमलबजावणी केली. स्वर्गीय कांबळे यांचे चिरंजीव परिमल कांबळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी अहो रात्र कष्ट करीत असत. त्यासाठी ते वेळकाळ काहि न बघता इतरांच्या मदतीला तातडीने धावून जात याबाबतचे अनेक अनुभवाचे त्यांनी कथन केले.यावेळी भाजपा प्रदेश अनु.जाती मोर्चा उपाध्यक्ष गणेश कांबळे, संतोष शेळके, गोपाळराव बस्ते, अंबादास आहिरे, विश्वासराव कांबळे, माधवरराव कांबळे यांनी श्रध्दांजलीपर भाषणे करून श्रध्दांजली वाहिली. प्रा.कुणाल वाघ यांनी श्रध्दांजली सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.
यावेळी स्वर्गीय मधुकर कांबळे मुलगा पराग कांबळे, पंकज कांबळे, भाऊ माधवराव कांबळे, प्रा.संजय शिर्डीकर, अमित मागो, पराग बारगीर, भाजपा अनु.जाती मोर्चा शहराध्यक्ष शशांक हिरे, भाजपा नाशिक महानगर सरचिटणीस सुनिल केदार, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, संतोष नेरे, अविनाश पाटील, काशिनाथ शिलेदार, भाजपा अनु.जाती मोर्चा सरचिटणीस कुंदन खरे, उपाध्यक्ष गजानन रणबावळे, कविता तेजाळे, मदन निकम, अनिल मोरे, दशरथ लोखंडे, बाळू आठवले, प्रा.शरद मोरे, शाहिन मिर्झा, बबन गायकवाड, योगेश मोरे, रविंद्र पाटील, दिनकर लांडगे,किशोर शिरसाठ, नंदा पुणेकर, नंदीनी रणबावळे, संतोष शेळके, संतोष डोंगरे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.