घोटी । राहुल सुराणा
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस घोटी शहरातून येत नसलेल्या कारणावरून घोटी शहरातील प्रवास यांनी सदर बसेस या घोटी गावातूनच आणल्या पाहिजे तसेच इगतपुरी नाशिक शटल बस सेवा सुरु करावी अश्या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी घोटी शहरप्रमुख प्रफ्फुल कुमट यांच्यासमवेत सर्व पदाधिकाऱ्यांनी इगतपुरी आगार प्रमुख यांना देण्यात आले.
इगतपुरी आगाराच्या इगतपुरी नाशिक व लांब पल्ल्याच्या बसेस घोटीकडे येताना परस्पर महामार्गाने बस स्थानकात जाता गावातून गाड्या न घेतल्यामुळे वृद्धांची तसेच स्त्रियांची व लहान बालकांची फार मोठी अडचण तयार होते. तसेच रात्रीच्या वेळी महामार्गाला उतरणे हे म्हणजे जीवावर बितू शकते. त्यामुळे सदरच्या सर्व बसेस घोटी शहरातून घ्याव्यात अशी मागणी घोटीतील प्रवाशांनी केली आहे. सदर बसेस गावातून न घेतल्यास कोणत्याही अनुचित प्रकार होऊ शकतो तरी इगतपुरी आगाराने या संदर्भात गांभीर्याने विचार करून सर्व बसेस घोटी गावातून रात्रीच्या वेळी घेण्यात यावा असे निवेदन पक्षाच्या वतीने देण्यात आले.
तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नाशिक शहरासाठी इगतपुरी ते नाशिक अशी दिवसभर शटल सेवा सुरु करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महेशजी श्रीश्रीमाळ,अण्णासाहेब डोंगरे,पांडुरंग बर्हे,सिमाताई झोले,निखिल हंडोरे, प्रफुल्ल कुमट, कैलास कस्तूरे, जगन भगत, योगेश सोनवणे, बाळासाहेब साखला ,अनिल चौधरी,विलास झोले, सौ.पल्लवीताई शिंदे,वैशालीताई आडके, प्रतिभाताई काळे, सुनिताताई सिंघल,व इतर पदाधिकारी हजर होते
————————————
@ दोन-तीन वेळा इगतपुरी आगाराच्या वाहक आणि चालक यांना घोटी गावात मारहाण केल्याच्या कारणावरून तसेच गावातील अतिक्रमणामुळे बसेस धावायला मोकळा रस्ता नसल्याने तसेच जैन मंदिर परिसर व गणपती मंदिर परिसरात रात्रीच्यावेळी सुद्धा फार अडचण येते . त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सदर बसेस घोटी गावातून न्यायायच्या नाही असा आदेश काढल्याचे आगारप्रमुख यांनी सांगितले.
Comments are closed.